विजय बेदरकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी केली वकीलीची परीक्षा उत्तीर्ण

0
209

चित्रा कापसे/तिरोडा–शिक्षणाला वयाचं बंधन नसते फक्त लागते ती मनापासून इच्छाशक्ती काही करुन दाखविण्याची जिद्द ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना *”मन मे है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन* याच उक्तीप्रमाणे साई काॅलोनी तिरोडा येथील सेवा निवृत्त न्यायालयीन कर्मचारी विजय बेदरकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी वकीलीची परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर दाखवून दिलं की शिक्षणासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं लागते ती जिद्द त्यांनी आजच्या नविन पिढीसमोर फार मोठा आदर्श निर्माण केला आहे.
विजय बेदरकर हे गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयात कार्यालयीन अधीक्षक पदावरून ३१/१/२०२१ ला सेवानिवृत्त झाले, त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात न्यायालयातील वकील मंडळींची कार्यप्रणाली पाहून आपणही वकीलीची सनद मिळवावी ही महत्वाकांक्षा त्यांच्या मनात होती. परंतु सेवाकाळात कुटुंबाच ओझं व नौकरीचं बोझं वहन करत ते स्वप्न त्यांनी सेवानिवृत्तीनंतर पत्नीच्या निधनामुळे मानसिकरीत्या पुर्णतः खचून गेल्यावरही पत्निच्या स्मरणार्थ एलएलबी ची तयारी जिद्द, चिकाटी, समर्पण व एकाग्रताच्या जोरावर सातत्याने अभ्यास करून सलग परीक्षा उत्तीर्ण केली. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम वर्षाच्या निकालात ते एलएलबी उत्तीर्ण होऊन अँड.विजय बेदरकर म्हणून नव्याने उदयास आले, विजय बेदरकर हे अत्यंत प्रामाणिक,प्रतिभावंत,अभ्यासू व तल्लख स्मरणशक्ती असलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांनी नव्याने सुरू केलेल्या वकिलीच्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही.