जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध

0
87

गोंदिया,दि.१९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचा अडिच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष मनोज गोंडाने व उपाध्यक्ष आनंदकुमार चर्जे यांनी राजीनामा दिला. दरम्यान १८ जून रोजी समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक अध्याशी अधिकारी सिद्धार्थ गणवीर व सचिव कमलेश बिसेन यांच्या उपस्थित पार पडली.
दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी फक्त एक-एक अर्ज आल्याने अध्यक्षपदी दीपिका यादव तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर चौधरी यांनी अविरोध निवड करण्यात आली. उल्लेखनीय असे की, समितीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराजमान झाल्या आहेत. यावेळी संस्थेचे संचालक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत कार्यरत १८ प्रवर्ग असून २३ संचालक मंडळाची कार्यकारिणी असतानाही महिला अध्यक्ष बनविणे ऐतिहासिक बाब ठरली.त्यातही ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याचे श्रेय संस्थेचे सचिव कमलेश बिसेन व सर्व संस्थेचे संचालक तसेच पक्ष कोअर कमिटी यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळात शाखा प्रमुख सचिन कुथे, मनोज गोंडणे, आनंदकुमार चार्जे, कुवरलाल रहांगडाले, हंसराज गजभिये, ओमेश्वर बिसेन, रितेशकुमार शहारे, अजयकुमार रामटेके, मनोज भुरे, वीरेंद्र कुंभरे, सुनील राठोड, रेखा पारधी, प्रेमलता बागडे, संगीता बिसेन, नामदेव मेश्राम, रविकुमार पटले, चंद्रकांत धपाडे, संचालक दयानंद फटिंग, सीमा भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन सचिव कमलेश बिसेन,प्रल्हाद शहारे महासंघ अध्यक्ष, शैलेश कुमार बैस माजी सरचिटणीस महासंघ, सौरभ अग्रवाल कार्याध्यक्ष, संतोष तोमर सरचिटणीस, पदाधिकारी नंदलाल कावळे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष भगीरथ नेवारे,मोरेश्वर बिसेन,तिलक पटले,श्रीमती तेजस्विनी चेटुले,श्रीमती चित्रा ठेंगरे, सुभाष खत्री, संतोष तुरकर, अभिजित बोपचे, कार्तिक चव्हाण, कुलदीप कापगते, शैलेश परिहार, रामा जमाईवार, योगराज बिसेन, भागेष चव्हाण, तारेश कुबडे, गायक ठाकूर, पवन पवार, संदीप मेंढे, शिवाजी राठोड, सरिता ब्राम्हवंशी, योगेश रुद्रकार, सुरेश वाघमारे, रजनी सहारे, भारती वाघमारे, टिकाराम जाबंधू, प्रदीप ठाकरे, किशोर आचल, नम्रता रंगारी, नरेंद्र गोमासे, योगेश कटरे, रविन्द अंबाडे, निशिकांत मेश्राम, सुमेध बनसोड, ओम कापगते,खडके, राजेश रामटेके, गीता बाई चौधरी, साधना करपगये , शारदा ठवरे, तिरुमला लडरे तसेच जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.