
सायकलिंग संडे ग्रुप चे 2 सदस्य गोंदिया पंढरपूर गोंदिया सायकलवारी करून गोंदियात येताच भव्य स्वागत…
गोंदिया :- पर्यावरण संरक्षण, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि पेट्रोल बचत याबद्दल जन जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, टायगर ग्रुप ऑफ अॅडव्हेंचर आणि नागपूरच्या क्रीडा भारती यांनी संयुक्तपणे आषाढी एकादशीनिमित्त १५ ते २२ जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजित केले आहे. या सायकल वारी मध्ये १३ ते ८५ वयोगटातील लोकांनी सहभाग घेतला असून विदर्भातील ८५ सायकलस्वार सहभागी झाले होते. ज्या मध्ये गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुप चे दोन सदस्य अशोक मेश्राम व माजी सैनिक उदयभान निर्वाण यांनीही सहभाग घेतला असुन त्यांनी गोंदिया पंढरपूर गोंदिया सायकल वारी मध्ये सहभागी होऊन ११ दिवसात १००० किलोमीटर चा प्रवास त्यांनी सायकलने केला तर आज गोंदिया येथे आल्यावर त्यांचा गोंदिया येथील आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी दोन्ही सायकलिस्ट चा साल व नारड देऊन स्वागत करण्यात आले तर यावेळी माजी नगर सेविका भावना कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर, सागर कदम त्याच प्रमाणे सायकल संडे चे अध्यक्ष मंजू कटरे, सचिव रवि सपाटे, विजय येडे, प्रवीण हालानी, भगीरथ जीवानी, सुनील श्रीवास्तव, आकाश कटरे, दीपाली वाढई, मोहना निरवान, संगीता गायधने, सुनील कावडे, उमेश माधवानी, अजित शेणमारे, खिलेश चौरसिया, गोपाल रहांगडाले यांनी पंढरपूर येथून येणाऱ्या सायकलिस्ट चा भव्य स्वागत केला.
चार हजार सायकलस्वार सहभाग घेतला
२२ तारखेला पंढरपूरमध्ये बैठक आणि रिंगण समारंभ पार पडला या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ८२ वेगवेगळ्या क्लबचे सायकलस्वार पंढरपूरमध्ये एकत्र आले आणि वारकऱ्यां प्रमाणे २२ जून रोजी ‘रिंगण सोहळा’ कार्यक्रम पार पडला या मध्ये सायकलने रिंगणा मध्ये सहभागी झाले. राज्यभरातून सुमारे चार हजार सायकलस्वार यात सहभागी झाले होते. ता या वारीला पहिल्यांदा गेलो आणि आणि आता या वारीला दर वर्षी जाण्याचा विचार केला असुन आपल्या गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुप मध्यल्या सदस्यांना सुद्धा त्यासच जे पंढरपूर सायकलने येण्यास इच्छुक रहाणार त्यांना सुद्धा पुढच्या वर्षी या पंढरपूर सायकल वारी मध्ये मी सहभागी होण्यास प्रोहत्सान देणार.
माजी सैनिक उदयभान निर्वाण
सायकल संडे ग्रुप सदस्य