धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानंतर्गत चिचगड येथे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर

0
14

गोंदिया,दि.२४ः-जिल्ह्यात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान 49 गावात राबविण्यात येणार आहे.त्यातुन शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ गावपातळीवरील लोकांना पोहचविणे आहे.दि.20 जुन रोजी देवरी तालुक्यातील चिचगड येथे तालुका आरोग्य प्रशासनामार्फत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर संपन्न झाल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे यांनी दिली आहे.
दि. 20 जुन रोजी चिचगड येथील श्रीराम विद्यालय येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान शिबीर घेण्यात आले.यामध्ये शासनाच्या सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडीच्या वतीने आरोग्य विभागाचा स्टॉल लावण्यात आला.या ठिकाणी अंसासर्गिक कार्यक्रमाच्य अनुशंगाने रक्तदाब व मधुमेह तपासणी,सिकलसेल तपासणी सोबतच गरजु लोकांची वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी व समुपदेशन करुन औषधोपचार करण्यात आला.आरोग्य विभागाच्या जनजागृती स्टॉल मध्ये क्षयरोग,कुष्ठरोग,सिकलसेल,हिवताप,स्टॉप डायरीया,मलेरिया व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या बॅनर व पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मानकर यांनी याप्रसंगी दिली आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मानकर,,डॉ.येरणे,डॉ.आकाश कुकडे,क्षयरोग पर्यवेक्षक भगवतकर,आरोग्य सहाय्यक वरकडे,तालुका संगणक परिचालक शहारे,समुदाय आरोग्य अधीकारी काळे,शेलारे व राठोड,औषध निर्माण अधिकारी गाढवे,आरोग्य सेवक सोनटक्के,आरोग्य सेविका मेश्राम व कावळे,आशा गट प्रवर्तक शहारे यांचे सोबत कार्यक्षेत्रातील आशा सेविका यांनी उपस्थिती राहुन आरोग्य सेवा दिली.