ठाणेगाव जिल्हा परिषद शाळेतील इमारतीचे लोकार्पण

0
16

तिरोडा,दि.२५ः-तालुक्यातील ठाणेगाव येथे अदानी फाउंडेशनच्या वतीने बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्या व वरांड्याचे लोकार्पण स्थानिक आमदार विजय भाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्या एड.माधुरीताई रहांगडाले यांनी या इमारतीसाठी अदानी फाउंडेशनकडे पाठपुरावा करून ठाणेगाव येथे दोन वर्ग खोल्या व वर्हांडाचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केले होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे हे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच महत्त्वाचे भौतिक सुख सुविधा देणे अत्यंत आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होईल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता व बुद्धिमत्ता वाढेल.अदानी फाउंडेशनचे हेड विपिन दोशी यांनी अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील शाळा तसेच गावांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी जि.प.सदस्या एड्.माधुरीताई रहांगडाले,अदानी फाउंडेशनचे विपिन पटेल, सरपंच आय.टी.पटले, उपसरपंच कैलास पटले , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश ठाकूर,शाळेचे मुख्याध्यापक कोठे व शाळेचे शिक्षकवर्ग तसेच ग्रामपंचायतचे संपूर्ण पदाधिकारी ,मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश ठाकूर यांनी केले तर संचालन शिक्षिका ममता पटले व आभार प्रदर्शन शिक्षिका शारदा पारधी यांनी केले.