
गोंदिया,दि.२७-आरोग्य संस्थामधील सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम व कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 38 आरोग्य संस्थांना 2024-25 वर्षातील कामगिरी केल्याबद्दल 13 लाख 85 हजार रुपयांचे कायाकल्प पुरस्कार जाहीर झाले आहेत.जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील सोनी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांकाचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार या योजनेेत पटकावला आहे.
रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी 2015 वर्षापासुन कायाकल्प पुरस्कार योजना सुरू केली असून या पुरस्काराकरिता रुग्णालयांची आतील व बाह्य परिसर स्वच्छता,निर्जंतुकीकरण,बेड स्वच्छता,उपलब्ध साधनांचा वापर,योग्य आय.ई.सी लावणे,प्रसूतीगृहाचा वापर व स्वच्छता,प्रयोगशाळा बळकटीकरण व स्वच्छता,अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता,रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा, लोकसहभागातुन कार्यक्रम राबविणे,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर,जैविक घनकचऱ्याचे व्यवस्थापन व त्यांची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणी बचत व सांडपाण्याचा निचरा, कर्मचाऱ्यांचे रुग्णासोबत वर्तणुक, रुग्णांचे मनोगत आदि प्रत्येक बाबीसाठी गुण असून या निकषांवर पुरस्कार जाहीर केले जात असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी या वेळी दिली.
आय.एस.ओ.मानांकनाच्या धर्तीवरील या पुरस्कारासाठी आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी सुविधा उपलब्ध करून स्वतः तपासणी करून प्रस्ताव सादर करतात त्यानुसार जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी केली जाते तसेच जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थांना प्रथम,द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असल्याची माहीती जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ.पंकज पटले यांनी यावेळी दिली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यां विविध स्तरातुन मानांकन देवुन पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी या वेळी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरासाठीचा प्रथम मानांकन पुरस्कार गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनीला रु दोन लाख तर प्रोत्साहनपर म्हणुन गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा,आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव व देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला यांना प्रत्येकी रु.50 ह्जार पुरस्कार करिता निवड झाली आहे.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र स्तरासाठी एकुण 34 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रानी पुस्कार प्राप्त केला आहे.गोरेगाव तालुक्यातील उपकेंद्र पाथरी व तिरोडा तालुक्यातील उपकेंद्र खैरबोडी यांना रु.एक लाख तर गोंदिया तालुक्यातील उपकेंद्र ढाकणी यांना रु. 50 हजार तर आमगाव तालुक्यातील उपकेंद्र शिवनी यांनी रु.35 हजार पुरस्कार करिता निवड झाली आहे. तर 30 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांनी प्रत्येकी रु. 25 हजार जाहीर झाले आहे.
तालुकानिहाय पुरस्कार प्राप्त आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची माहिती
गोंदिया तालुक्यातील 10 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात ढाकणी,पांढराबोडी,तेडवा कोरणी,धापेवाडा,डांगुर्ली,बटाणा
तिरोडा तालुक्यातील 5 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात खैरबोडी,लाखेगाव,अर्जुनी, गोंडमोहाडी व काचेवानी यांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातील 5 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात शिवनी,वडद(तिगाव),किक्रीपार, भोसा/कालीमाटी,अंजोरा यांचा समावेश आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील 4 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात घाटबोरी,बोपाबोडी, घोटी(डव्वा) व तिडका यांचा समावेश आहे.सालेकसा तालुक्यातील 3 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात तीरखेडी,धानोली(सातगाव) व भजेपार यांचा समावेश आहे.
गोरेगाव तालुक्यातील 3 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात पाथरी,कवलेवाडा,व कटंगी व यांचा समावेश आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 2 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात बोंडे व पिंपळगाव यांचा समावेश आहे.देवरी तालुक्यातील 2 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र त्यात चिचेवाडा व डवकी यांचा समावेश आहे.
पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका, परिचर,स्वछक यांनी आपल्या आरोग्य संस्थेला जास्त गुण मिळणे व ऊत्तम आरोग्य सुविधा लोकांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे.त्यासर्वांचे काम अभिनंदनास पात्र असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी म्हटले आहे.