तिरोडा,दि.२८ः-राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जुन महिन्यात दि.1 ते 30 जुन हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो.या महिन्यादरम्यान, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि मेंदूज्वर यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहिम आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जातात. या अनुषंगाने हिवताप व इतर कीटकजन्य आजाराविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत असते तसेच हिवताप,डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराबाबत कार्यशाळेतुन विविध अद्यावत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली.
दि.26 जुन रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तिरोडा येथे पावसाळा पूर्व किटकजन्य आजार नियंत्रण, जलजन्य आजार व उपाययोजनासंबंधी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण व तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिरोडा तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक उपस्थित होते. हिवताप कार्यशाळेत हिवताप विभागाचे कीटकशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किशोर भालेराव,एंम्बेड अशासकीय संस्थेचे जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी मार्गदर्शन केले.
हिवताप कार्यशाळेत जिल्हा हिवताप कार्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे यांनी हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र,पाण्यात डासांची होणारी वाढ,डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढ्ळणारे बदल, किटकशास्त्रीय सर्वेक्षण,हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याची विस्तृत माहीती उपस्थितांना दिली.
जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किशोर भालेराव यांनी हिवताप प्रतिबंधात्मक उपाय जसे गप्पी मासे,अँबेट सोडणे,संडास-बाथरुम च्या पाईपला व्हेंट जाळी बसविणे,मच्छरदाणीचा वापर,गुणवत्तापुर्ण फवारणी, नियमित गृहभेटी दरम्यान करावयाचे कामे, विविध विभागांचा हिवताप कमी करण्याची जबाबदारी कीटकजन्य आजारासंबंधी माहिती व कीटकजन्य आजारावर शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
फैमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी जिल्ह्यात त्यांच्या स्वंयसेवक यांच्या मार्फत होत असलेले सर्वेक्षण व जनजागृतीवर माहीती दिली.हिवताप कार्यशाळा यशस्वीतेसाठी तिरोडा तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाणे यांनी विशेष प्रयत्न केले.