
मार्च २०१७ पर्यंत एक्सलेटर आणि लिफ्ट सेवा सुरु करणार नाना पाटोले
गोंदिया,दि.5- गणेश चतुर्थीचे निमित्त साधून येथील जनता सहकारी बँकेच्या वतीने .गोंदिया रेल्वे स्थानकावर वृध्द आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वेप्लेटफार्मपर्यंत ने आण करण्याकरीता बॅटरी कार सुरु करण्यात आली. भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे रेल मंडळ प्रबंधक अमित अग्रवाल,अर्जुन सिब्बल ,जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राधेशयाम अग्रवाल यांच्या उपस्थितीत कारचे लोकार्पण करण्यात आले. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र ,मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्याच्या सीमेला लागून असल्याने रोज २० हजाराच्या वर प्रवाशी गोंदिया रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय निर्माण होऊ नये म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील महिन्यात आटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशीन लावण्यात आले .तर आजपासून दिव्यांग लोकांकरीता निशुल्क बॅटरी कार सेवा सुरु करण्यात आली. गोंदिया रेल्वे स्थानकाला अजून सुसुज्ज करण्यासाठी मार्च २०१७ पर्यत्न गोंदिया रेल्वे स्थानकावर एक्सेलेटर आणि लिफ्ट सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे खा. पाटोले यांनी सांगितले.सोबतच मार्च 2018 पर्यंत जबलपूर मार्गावर रेल्वेसेवा सुरु होणार असून दक्षिणेकडे जाणार्या किमान 50 गाड्या या स्थानकावरुन जाणार असल्याचे सांगितले.येथील जनता सहकारी बँकेकडून स्वयंखर्चाने सुरु करण्यात आलेल्या कार सेवे करीत दोन चालकांची व्यवस्था करण्यात आली आहे.या चालकांचा पगार हि बँक देणार आहे आणि या बॅटरी कारचे मेन्टनेशन देखील बँक कारणांर असल्याने फक्त रेल्वे विभागाला बॅटरी चार्जिंग करण्याकरीता वीज पुरवठा करायचा आहे त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर आलेल्या दिव्यांग लोकांना होम पॅलेट फॉर्म १ ते ७ पर्यंत हि कार निशुक्ल पोहचविण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाला रमण मेठी,बँकेचे संचालक,रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी,न.प.बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे,गोकूल कटरे,सुनिल केलनका,भगत ठकरानी,महेश आहुजा,गुड्डू कारडा,भरत क्षत्रिय,घनश्याम अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.संचालन नगरसेवक दिनेश दादरीवाल यांनी केले तर आभार बँकेचे व्यवस्थापक उमेश जोशी यांनी मानले.