Home विदर्भ गॅस कनेक्शनमुळे वनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत- डॉ.जितेंद्र रामगावकर

गॅस कनेक्शनमुळे वनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत- डॉ.जितेंद्र रामगावकर

0

गोंगले येथे गॅस कनेक्शन वाटप
गोंदिया,दि.२८ : गावातील ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात त्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सरपनाकरीता त्यांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व वनाचे नुकसान टाळण्यासाठी गॅस कनेक्शनच्या वाटपामुळे ग्रामस्थांना मोठी मदत झाली आहे. असे प्रतिपादन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले.
२७ ऑक्टोबर रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथे वन विभागाच्या वतीने गोंगले संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत गावातील ३९ कुटुंबांना गॅस कनेक्शचनचे वाटप डॉ.रामगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकार मंदार जवळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक केशव वाभळे, पं.स.सदस्य प्रमिला भोयर, सरपंच दामिनी गावड, सेवानिवृत्त सहायक उपवनसंरक्षक अश्वीन ठक्कर, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले, सचिव दुलीचंद बुध्दे, माजी सरपंच देवराव रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरणलाल रहांगडाले, उपाध्यक्ष नरेश केवट, कोषाध्यक्ष प्यारेलाल रहांगडाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.रामगावकर पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात गोंगले येथील ज्या कुटुंबांची गॅस कनेक्शनची मागणी आहे त्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्याचा प्रयत्न राहील. वन विभागामार्फत सन २०१२ पासून ही योजना सुरु आहे. जी गावे वनालगत आहे त्या गावातील कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात येतील. या गॅस कनेक्शनमुळे वनाचे नुकसान टाळण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.
श्री.जवळे म्हणाले, गोंगले हे गाव अनेक बाबतीत आदर्श आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजुट या गावात दिसून येते. वनालगत असलेल्या हे गाव सौंदर्याने नटलेले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घेवून आपले जीवन सुखकर करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री.खडसे यांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले. गावातील अनुसूचित जातीच्या ९ कुटुंबांना आणि इतर मागासवर्गातील ३० कुटुंबांना गॅस कनेक्शनचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गॅस कनेक्शनमुळे गावातील संबंधित कुटुंबांना चांगला फायदा होणार असल्याचे मनोगत प्रेमलबाई रामटेके यांनी व्यक्त केले. श्री गायत्री भारत गॅस एजंसी गोरेगावचे संचालक नितीन बारेवार यांनी गॅस वापराबाबत उपस्थित महिलांना प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमराज गजभिये, भोजराज चौधरी, देबीलाल बघेले, श्रीमती सविता निकुरे, कांता टेंभरे, मनोरमा बोपचे, सुनिता भेलावे, मालन खांडवाहे यांचेसह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्यकारी अध्यक्ष डी.यु.रहांगडाले यांनी मानले.

Exit mobile version