Home विदर्भ रविवारला लाखनीत भंडारा जिल्हास्तरीय ओबीसी मेळावा

रविवारला लाखनीत भंडारा जिल्हास्तरीय ओबीसी मेळावा

0

लाखनी,दि.03-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या 8 डिसेंबरला नागपूर विधानभवनावर आयोजित ओबीसी महामोर्च्याच्यानिमित्ताने प्रचार व प्रसारासाठी उद्या रविवार 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता भंडारा जिल्हास्तरीय ओबीसी महामेळ्याव्याचे आयोजन येथील कुणबी समाज सभागृह केसलवाडाफाटा येथे करण्यात आले आहे.या महामेळाव्याचे उदघाटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे यांच्या हस्ते माजी आमदार सेवक वाघाये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्षसमन्वयक माजी खासदार डाॅ.खुशालराव बोपचे,भंडारा-गोंदियाचे खासदार नानाभाऊ पटोले,माजी खासदार केशवरावजी पारधी,माजी मंत्री प्रा.महादेवराव शिवणकर ,आमदार सुनिल केदार,माजी आमदार सुधाकर गणगणे,अनंतराव घरड,प्रमोद मानमोडे उपस्थित राहणार आहेत.पाहुणे म्हणून तर भंडारा जि.प.भाग्यश्री गिलोरकर,गोंदिया जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,आमदार बाळाभाऊ काशीवार,आमदार चरण वाघमारे,आमदार विजय रहागंडाले,आमदार परिणय फुके,माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे,बंडुभाऊ सावरबांधे,भरतभाऊ बहेकार,विलास श्रृगांरपवार,माजी आमदार अॅड आनंदराव वंजारी,अॅड मधुकरराव बेदरकर,डाॅ.हेमकृष्ण कापगते,मधुकर कुकडे,सुभाष कारेमोरे,रमेश कुथे,खोमेशभाऊ रहागंडाले,हेमंत पटले,भैरसिह नागपूरे,दयाराम कापगते,केशवराव मानकर,लाखनी नप अध्यक्ष कल्पनाताई भिवगडे,ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर,प्राचार्य अशोक जिवतोडे,भंडारा-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोंजक व प्रसिध्दीप्रमुख खेमेंद्र कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक जिवन लंजे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा समिती प्रमुख मनोज चव्हाण,ओबीसी संघर्ष कृती समिती भंडारा जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते,उपाध्यक्ष डाॅ.अजयराव तुमसरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सघटंक प्रा.शेषराव येलेकर,अॅड.विरेंद्र जायस्वाल, विनायक बुरडे,गोविंद शेंडे,विकास ठाकरे,प्रशांत धव़ड,नरेश गावंडे,नरुभाऊ जिचकार,तानाजी वनवे,नाना गावंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या ओबीसी महामेळाव्याला भंडारा-गोंदिया जिल्हयातील ओबीसी समाजबंधू भगिनीनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version