Home विदर्भ नासुप्र होणार ‘हद्द’पार

नासुप्र होणार ‘हद्द’पार

0

नागपूर : नागपूरच्या विकासासाठी ८० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) बरखास्तीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. एनआयटीचे अस्तित्व नागपूरसाठी आवश्यक आहे की नाही हा गेली अनेक वर्षे वादाचा विषय होता. एनआयटीने नागपूरच्या सुनियोजित विकासासाठी नेमके काय योगदान दिले असेही विचारले जात होते. नागपूर शहर आणि सभोवतालच्या महानगर क्षेत्राच्या विकासासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अस्तित्वात आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून नागपूर महापालिका अस्तित्वात आहे. त्यामुळे आता एनआयटीची आवश्यकता राहिलेली नाही. नागरिकांना त्यांची कामे करताना निर्माण होणारा संभ्रम टाळण्याच्या दृष्टीने एनआयटी बरखास्त करण्यात येत असल्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली. त्यानुसार नासुप्र वर्षभरात शहरातून हद्दपार होणार आहे. २५ डिसेंबर १९३६ मध्ये एनआयटीची स्थापना करण्यात आली होती.

Exit mobile version