Home विदर्भ गोंदियात नगराध्यक्षपदी भाजपचे इंगळे १८ नगरसेवकासह विजयी

गोंदियात नगराध्यक्षपदी भाजपचे इंगळे १८ नगरसेवकासह विजयी

0

एका दशकानंतर बसपचे पुन्हा नगरपरिषदेत आगमन
बसपने रोखले राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला
गोंदिया,,berartimes.com दि.०९-गोंदिया नगरपरिषदेच्या ८ जानेवारीला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पार पडली.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह सर्वाधिक १८ जागावर विजय मिळविला.नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक (गप्पु)गुप्ता यांचा ५८८२ मतांनी पराभव केला.तिसèया क्रमांकावर काँग्रेसचे राकेश ठाकुर राहिले.तर चौथ्या क्रमांकावर बसपचे पंकज यादव आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेनेचे दुर्गेश रहागंडाले हे राहिले.
गोंदिया नगरपरिषदेच्या २१ प्रभागातील ४२ जागापैकी १८ जागा भारतीय जनता पक्षाने,९ जागा काँग्रेसने ,७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने,बहुजन समाज पक्षाने ५ जागा,शिवसेनेने २ जागा आणि अपक्षाने १ जागा qजकली.प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन गोंविद शेंडे यांनी विजय मिळविला.

विजयी उमेदवारामध्ये प्रभाग १ मधून घनश्याम पानतवणे व विमला मानकर (भाजप),प्रभाग २ मधून राष्ट्रवादीचे हेमंत पंधर व कुंदाताई पंचबुध्दे,प्रभाग ३ मधून विवेक मीश्रा व अनिता मेश्राम(भाजप), प्रभाग ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश देशमुख व सविता मुदलियार ,प्रभाग ५ मधून भाजपच्या रत्नमाला साहू व काँग्रेस बंडखोर अपक्ष सचिन शेंडे,प्रभाग ६ मधून भाजपच्या भावना कदम व अपसाना पठाण,प्रभाग ७ मधून काँग्रेसचे क्रांती जायस्वाल व श्रीमती शिलू राकेश ठाकूर,प्रभाग ८ मधून काँग्रेसचे शकिल मंसुरी व श्वेता पुरोहित,प्रभाग ९ मधून जितेद्र पचबुध्दे व आशालता चौधरी(भाजप),प्रभाग १० मधून मैथुला बिसेन व दिपक बोबडे (भाजप).

प्रभाग ११ मधून हेमलता पतेह व धर्मेश अग्रवाल (भाजप),प्रभाग १२ मधून शिव शर्मा व मौसमी परिहार (भाजप),प्रभाग १३ मधून बसपच्या गौसिया शेख व काग्रेसचे सुनिल भालेराव,प्रभाग १४ मधून बसपचे कल्लू यादव व ज्योत्सना मेश्राम,प्रभाग १५मधून भाजपच्या नितु बिरीया व दिलीप गोपलानी,प्रभाग १६ मधून बसपाच्या ललिता पंकज यादव व संकल्प खोब्रागडे ,प्रभाग १७ मधून काँग्रेसच्या निर्मला मिश्रा व राष्ट्रवादी काँग्रेसचे विनित शहारे,प्रभाग १८ मधून भाजपच्या वर्षा खरोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय रगडे,प्रभाग १९ मधून शिवसेनेचे राजु कुथे व नेहा नायक,प्रभाग २० मधून राष्ट्रवादीच्या मालती राजेश कापसे व काँग्रेसचे सुनिल तिवारी आणि प्रभाग २१ मधून काँग्रेसच्या दिपिका रुसे व भागवत मेश्राम निवडून आले.

Exit mobile version