भाजपातून ५४ बंडोबांची हकालपट्टी

0
11

नागपूर दि. 10: महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना महागात पडले आहे. संघभूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी पक्षाने गंभीरतेने घेतली असून, ५४ जणांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निलंबितांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा बाळगून असलेल्यांचा समावेश आहे.शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करीत निवडणुकांचा अर्ज दाखल केला.कुणी शिवसेना, बसपा यासारख्या पक्षाची कास धरली तर अनेकांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले आहे.