
गोंदिया,दि.१०-देशाच्या इतर राज्यात महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जात असले तरी आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यातील कुठल्याही भागात सहकार चळवळ बळकट झालेली नाही.त्यासाठी ही चळवळ लोकाभिमूख करण्यासोबतच शेतकरी वर्गाशी जोपर्यंत सवांद वाढविण्यावर भर दिला जात नाही,तोपर्यंत सहकार क्षेत्राचा विकास शक्य नसल्याचे विचार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित अटल पणन विकास अभियान जिल्हा कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलत होते.यावेळी सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनqसह कटरे,जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव,मार्केटिंग अधिकारी खर्चे,प्रमुख मार्गदर्शक गणेश qशदे,माजी आमदार भैरqसह नागपूरे,जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक विलास वासनिक उपस्थित होते.जिल्ह्यातील तालुका खरेदी विक्री,विविध सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व जिल्हानिबंधक,तालुका उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.यावेळी अटल पणन विकास अभियानाची सविस्तर माहिती जाधव यानी दिली.लखनqसह कटरे यानी गोंदिया जिल्ह्यात आजही सहकार चळवळ शुन्य असल्याचे सांगत सहकाराच्या विकासासाठी राजकारणाला बाजू ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले.गणेश qशदे यानी संंस्थानी आपला एक नियोजन करुन वस्तु विकण्याची मार्केqटग कला अवगत करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले.