Home विदर्भ अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे संजय नरवणे;उपमहापौरपदी संध्या टिकले

अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे संजय नरवणे;उपमहापौरपदी संध्या टिकले

0

अमरावती दि. 9 –: अमरावतीच्या महापौरपदी भाजपच्या संजय नरवणे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी संध्या टिकले यांची वर्णी लागली आहे.महापौरपदाच्या निवडणुकीत संजय नरवणे यांना 56 मते मिळाली तर त्यांच्याविरोधात असलेल्या काँग्रेसच्या शोभा शिंदे यांना अवघी 15 मते मिळाली.उपमहापौरपदाच्या निवडणुकीत संध्या टिकले यांनाही 56 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसचे अब्दुल वसीद अब्दुल मजीद यांना 15 आणि एमआयएमचे उमेदवार अफजल हुसेन यांना 10 मते मिळाली.

अमरावती महापालिका
भाजप – 45 शिवसेना – 7 काँग्रेस – 15 राष्ट्रवादी – 0 मनसे – 0 इतर – 20

Exit mobile version