Home विदर्भ वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0

चंद्रपूर,दि.२५: तळोधी (बा.) पासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगासागर हेटी येथील जंगलव्याप्त परिसरातील कक्ष क्रमांक ९७ येथे दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेवर हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. प्रेमिला ऊर्फ अंबाबाई रामकृष्ण बोरकर (४५, रा. गंगासागर हेटी) असे मृतक महिलेचे नाव आहे. सकाळी मोहफूल वेचण्यासाठी प्रेमिला लोहारडोंगरी परिसरातील जंगलात गेली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. वनविभागाने मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत २५ हजारांची तत्काळ मदत दिली.

Exit mobile version