Home विदर्भ बँकांनी बचतगटांच्या महिलांना मुद्रा योजनेतून स्वावलंबी करावे-बडोले

बँकांनी बचतगटांच्या महिलांना मुद्रा योजनेतून स्वावलंबी करावे-बडोले

0
????????????????????????????????????

गोंदिया,दि.२८ : महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी आता बचतगटांच्या महिलांना वैयक्तिकरित्या मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.२७ मार्च रोजी कायमस्वरुपी तालुका विक्री केंद्र तिरोडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने बचतगटांच्या महिलांचा मुद्रा बँक योजना मेळावा व गृहपयोगी वस्तू विक्री केंद्राचे उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य श्री.अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकत्र्या सविता बेदरकर, विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बडोले पुढे म्हणाले, बचतगटांच्या महिलांना कर्ज देण्यासाठी बँकांची भूमिका आजही सकारात्मक दिसत नाही. राष्ट्रीयकृत बँकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे करण्याचे दिलेले उद्दिष्ट किती साध्य झाली आहेत याची माहिती बँकांनी उपलब्ध करुन दयावी. बँका मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावर निश्चित कार्यवाही झाली पाहिजे. बचतगटांच्या माध्यमातून मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महिला सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. महिला बचतगटांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. महिला बचतगटांनी चांगले काम करुन तिरोडा तालुक्याचा विकासाला हातभार लावावा.मुद्रा बँक योजनेबाबत लाभाथ्र्यांना योग्य मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना कर्ज मिळवून देवून त्यांना स्वयंरोजगार करण्याची संधी उपलब्ध करुन दयावी असे सांगून आ.रहांगडाले म्हणाले.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील बँका, महत्वाच्या ग्रामपंचायती, तहसिल कार्यालय, पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालये अशा ३०० ठिकाणी लावण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती असलेल्या फोमशीटचे, विविध आकारातील भित्तीपत्रकांचे व पॉम्पलेटसचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विविध स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या युक्ती ग्रामसंस्था खेडेपार, संजीवनी ग्रामसंस्था जमुनीया, नवचेतना ग्रामसंस्था अर्जुनी यांना प्रत्येकी ३ लक्ष रुपये तर प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर, स्वावलंबन ग्रामसंस्था सातोना यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये जोखीम प्रवणता निधी, गौतमबुध्द ग्रामसंस्था वडेगाव, संबोधी ग्रामसंस्था वडेगाव, शारदा ग्रामसंस्था खोडगाव यांना प्रत्येकी १५ हजार रुपये फिरता निधी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
समृध्दी ग्रामसंस्था खुर्शीपार, तेजस्वीनी ग्रामसंस्था घाटकुरोडा व प्रगती ग्रामसंस्था गोबाटोला यांनी गावे हागणदारी मुक्त केल्याबद्दल बेलाटी येथील रमाबाई आंबेडकर बचतगट, कवलेवाडा येथील शिवानी बचतगट, बरबसपुरा येथील शुभलक्ष्मी बचतगट यांनी सर्वाधिक कर्ज घेतल्याबद्दल, उत्तम समुदाय साधन व्यक्ती म्हणून ठाणेगाव प्रभागच्या उर्मिला पटले, कवलेवाडा प्रभागच्या अरुणा डोंगरे, वडेगाव प्रभागच्या शारदा बघेले, अर्जुनी प्रभागच्या माया मराठे, सुकळी प्रभागच्या सुलोचना येळे, सेजगाव प्रभागच्या सिंधू भगत, सरांडी प्रभागच्या भाग्यश्री पटले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात सर्वप्रथम नोंदणीकृत सुकळी येथील तेजप्रवाह लोकसंचालीत साधन केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी स्वयंसहायता महिला बचतगटाचे २६ स्टॉल्स,जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य स्टॉल लावण्यात आले होते. मेळाव्याला तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील बचतगटांच्या महिला, ग्रामसंस्थेच्या पदाधिकारी, महिला बचतगटाच्या सहयोगीनी, पशु सखी, कृषी सखी, मत्स्य सखी, समुदाय साधन व्यक्ती सखी व इंटरनेट साथी बहुसंख्येने उपस्थित होत्या.यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक शिल्पा येळे, उपजिविका सल्लागार प्रितम पारधी, रेखा रामटेके, सारिका बंसोड, चित्रा कावळे, अनिता आदमने, विनोद राऊत, सुनिल पटले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन सनियंत्रण व मुल्यमापन समन्वयक सविता तिडके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

Exit mobile version