Home विदर्भ श्री संत सेनाजी महाराज जयंती महोत्सव २४ रोजी

श्री संत सेनाजी महाराज जयंती महोत्सव २४ रोजी

0
गोंदिया,दि.20:श्री संत सेनाजी महाराज जयंती उत्सव समितीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांची ७१७ वी जयंती कृष्णपुरा वार्डातील श्री संत सेनाजी महाराज मंदिर ट्रस्ट येथे २४ एप्रिल रोजी जयंती मोहत्सव सोहळा म्हणून साजरी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष पुंडलीकराव केळझरकर राहणार असून उद्घाटक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व दीप प्रज्वलक आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, न.प. नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, न.प. बांधकाम सभापती घनश्याम पाणतावने, प्रदेश नाभिक युवाध्यक्ष रवी बेलपत्रे, सरचिटनीस अरुण जमदाळे, प्रांत उपाध्यक्ष विजय वाटकर हे उपस्थित राहणार आहेत. महोत्सव कार्यक्रम २३ एप्रिल रोजी संत सेनाजी महाराज मंदिर कृष्णपुरा वार्ड येथे संध्याकाळी दीप प्रज्वलन व आराधना भजन कार्यक्रम तर २४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दहीकाला कार्यक्रम होणार आहे. तद्नंतर सकाळी १० ते १२ वाजता दरम्यान नगर भ्रमण शोभायात्रा काढण्यात येऊन १ वाजता अतिथींचे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाची सांगता महाप्रसादाने होणार आहे. ह्या शुभ पावनपर्वावर नाभिक समाज बांधवानी सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, महिला अध्यक्षा अनिता चन्ने, ट्रस्ट अध्यक्ष राजेश जांगळे, बारबर असोसिएशन अध्यक्ष वासु भाकरे, जिल्हायुवाध्यक्ष संजय चन्ने, दुलीराम भाकरे, सुशिल उमरे, प्रदिप लांजेवार, महेश लांजेवार, चुन्नीलाल सूर्यवंशी यांनी केले आहे.

Exit mobile version