Home विदर्भ दवनीवाडा येथे गाळमुक्त तलाव कामाचे भूमिपूजन,डोंगरगावला सीईओची भेट

दवनीवाडा येथे गाळमुक्त तलाव कामाचे भूमिपूजन,डोंगरगावला सीईओची भेट

0

गोंदिया,दि.२० -दवनीवाडा येथे गाळमुक्त तलाव योजनेतंर्गत तलाव खोलीकरण व कुशल अंतर्गत कामाच्या दुरुस्तीचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे यांच्या हस्ते करण्यात आले.लिल्हारे यांनी दवनीवाडा तलावाच्या कामाचे खोलीकरण व गाळ काढण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.जिल्हाधिकारी यांनी कामाला मंजुरी दिली असून २ लाख रुपयाच्या निधीतून हे काम होणार आहे.यावेळी तमुस अध्यक्ष भैय्यालाल सुर्यंवंशी,निलंकठ लांजेवार,कैन्हयालाल नागपूरे,पन्नालाल दमाहे,प्रेमसिह मंजुटे,विष्णु दोनोडे,राजु मंडेले,मधु बाडणे,घनश्याम येडे,रमेश उजगावकर,राजू लिल्हारे,सुदर्शन बघेले,गणेश लिल्हारे,संतोष सुर्यवंशी,ललीत मस्करे,गणेश बर्वे,मोहन बागडे,शिव सहारे,वसंत सहारे,नरेंद्र पटले व शेतकरी हजर होते.
सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथे मालगुजारी तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच.ठाकरे,जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,लघुपाटबंधारे विभाग जि.प.चे कार्यकारी अभियंता पाथाडे,उपविभागीय अभियंता कापगते,अशोक लांजेवार,यु.कापगते आदी उपस्थित होते.

Exit mobile version