Home विदर्भ चावडी वाचन मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -आ.परिणय फुके

चावडी वाचन मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -आ.परिणय फुके

0

तिरोडा,दि.21-सामान्य जनतेला संगणकाच्या एका बटनावर संपूर्ण माहिती उपलब्ध होवुन पारदर्शी कारभार व्हावा यासाठी शासनाने डिजिटल महाराष्ट्र हि योजना कार्यान्वित केली.महसुल विभागाने यामध्ये पुढाकार घेऊन संपूर्ण तलाठी दस्तावेज संगणीक्रत करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहेत.शेतकर्यांनी संगणीक्रत सातबारा नमुना ८ अचूक असल्याची खात्री करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अचूक संगणीक्रत सातबारा नमुना ८ चावडी वाचन विशेष मोहीम राबवली आहे .या मोहिमेच्या अंतर्गत शेतकर्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन महसुल दस्तावेज तपासून खात्री करून घेण्याचा आव्हान गोंदिया-भंडारा विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथे चावडी वाचन मोहिमेचा शुभारंभ करताना व्यक्त केले.

शासन व नवेझरी ग्राममंडळ यांच्या संयुक्त विधमाने नवेझरी गाव डासमुक्त अभियान कार्यक्रम हाती घेऊन घरातील व गावातील सांडपाणी जमीनीमध्ये कसे साठवता येईल व गावसुद्धा डासमुक्त होईल या करिता घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी सोकपीट लावण्यात आले याची पाहणीसुद्धा आ. फुके यांनी केली..यावेळी तिरोडा विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नवेझरी ग्राममंडळ अध्यक्ष अमोल नांदुरकर, संजय भांडारकर, संतोष शेंडे ,जगन्नाथजी भांडारकर, दयारामजी नांदगावे,ग्राममंडळचे सर्व पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य भूपेश्वर रहांगडाले,खानसी रहांगडाले,उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारी,तहसीलदार श्री.रामटेके व कर्मचारीवर्ग व सोबतच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version