Home विदर्भ जि.प. उपाध्यक्षांची जिटटी कुटुंबाला आर्थिक मदत

जि.प. उपाध्यक्षांची जिटटी कुटुंबाला आर्थिक मदत

0

आलापल्ली,दि.03:- कोड्सेलगुड्म येथील रमेश शंकर जिटटी या २२ वर्षीय युवकाचा एक महिन्याआधी  विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची कमलापूर परिसराच्या  दौऱ्यावर आलेले  जि.प. उपाध्यक्ष अजय   कंकडालवार यांनी   भेट घेवून त्यांना आर्थिक मदत केली. मृतक रमेशचे वडील   शंकर.व आई यांच्याकडे रक्कम सुपूर्द केली.
यावेळी जि.प. सदस्य अजय नैताम, जि,प.सदस्य,सुनीता कुसुनाके,  पंचायत समिति अहेरीच्या सभापती सुरेखा आलाम, उपसभापति राकेश तलांडे,प.स.सदस्य भास्कर तलांडे , ग्राम .पं. राजाराम चे उपसरपंच संजय पोरतेंट, कमलापूर ग्राम प॑ सदस्य संतोष तटिकोंडावार,  पत्रकार महेश गुंडेटीवार आदी उपस्थित होते. यावेळी जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे मृतकाच्या कुटुंबीयांना सांगितले.

Exit mobile version