Home विदर्भ पुरातन वृक्षांचे संवर्धन करा- पालकमंत्री बडोले

पुरातन वृक्षांचे संवर्धन करा- पालकमंत्री बडोले

0

गोंदिया,दि.६ : गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्टया संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. जिल्ह्यात काही शेतक?्यांच्या शेतीच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने वृक्ष आहे, त्या वृक्षांचे जतन करुन त्यांचे संवर्धन करावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नवेगावबांध जलाशय परिसराला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सहायक वनसंरक्षक श्री.उदापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.खान, श्री.रहांगडाले, उपअभियंता समीर बन्सोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नागपूर येथील वास्तू विशारद श्री.भिवगडे, विनोद नाकाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बडोले यांनी यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने नवेगावबांध जलाशय परिसरात बांधण्यात येत असलेल्या रिसॉर्टच्या कामाची पाहणी केली. जवळपास १० डिलक्स रुम, २ लोक निवास प्रत्येकी १० व्यक्तीच्या क्षमतेचे बांधण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट ५ हेक्टर क्षेत्रात बांधण्यात येणार असून यावर ८ कोटी रुपये खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी येथे चांगली निवास सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी जलाशय परिसरात बांधण्यात येत असलेल्या बीचची पाहणी केली. ५ कोटी पर्यंत इथे आणखी पर्यटन विकास कामे करण्याचे प्रस्ताव तयार करावे अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाèयांना यावेळी केली. झिप लाईनचे सुध्दा काम भविष्यात येथे सुरु होणार असल्याने पर्यटकांना आणखी एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे.
बडोले यावेळी म्हणाले, अलिकडच्या काळात वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडत आहे. पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची आज गरज आहे. शासनाने ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून यावर्षी ४ कोटी झाडे लावण्याचा संपल्प केला आहे. जिल्ह्यात निसर्ग संपदा समृध्द आहे. परंतू ही निसर्ग संपदा पुढील पिढीसाठी टिकवून ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाने एक नाविण्यपूर्ण उपक्रम आखलेला असून या उपक्रमाद्वारे ज्या शेतकèयांच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने वृक्ष आहे त्या शेतकèयांनी हे वृक्ष जतन करुन ठेवावे. या उपक्रमातून शेतकèयांना पुरातन वृक्षांचे जतन करण्यासाठी दरवर्षी एक हजार रुपये देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
या नाविण्यपूर्ण योजनेत शेतकèयांना वन्य पशूपक्षी व पर्यावरण संतूलन यासाठी उपयुक्त अशा ५० ते १०० वर्ष वयाच्या वृक्षांचे जतन करण्यासाठी जास्तीत जास्त १० वृक्षांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या वृक्षांमध्ये मात्र परदेशी वृक्ष जसे- निलगीरी, पेल्टाफोरम, रेनटड्ढी, सप्तपर्णी असे वृक्ष असेल तर मदत मिळणार नाही. तसेच ज्यापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे असे- मोह, सागवान या वृक्षांना अनुदान मिळणार नाही. जे भारतीय वृक्ष आहे उदा. चिंच, आंबा, जांभूळ, अंजन, धावडा, बेहडा, हिरडा, पळस इत्यादी सर्व वृक्षांना हे अनुदान लागू राहणार आहे. जे भारतीय प्रजातीचे मोठे उंच पुरातन वृक्ष आहे त्याची गणना करण्याचे काम वन विभागामार्फता सुरु आहे. या गणनेमध्ये शेतकèयांनी आपले पुरातन वृक्ष नोंदविले जातील याची काळजी घ्यावी. या उपक्रमाची शेतकèयांना जास्तीत जास्त माहिती होवून त्यांनी सर्वत्र आपल्या झाडाची नोंद वन विभागाकडे करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Exit mobile version