जिल्ह्यात ९६१ सिंचन विहीरींपैकी ४२ कोरड्या

0
11

गोंदिया,दि.06 :राज्यसरकारने पाण्याची भीषण टंचाई करुन दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत  ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली.या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद न मिळाल्याने सिंचन विहिरीची धडक मोहिम राबविण्यात आली.त्यासाठी जिल्ह्यासाठी 2 हजाराचे उदिष्ठ ठेवण्यात आले.त्या उदिष्ठापैकी 1525 विहिरींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.त्या ९६१ विहीरींपैकी ४२ विहीरींना पाणीच लागले नाही. यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे.

सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचन विहीरी देण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यात २ हजार विहीरींचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते व १ हजार ५२५ विहीरींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात २७५ पैकी २३९, गोंदियात २०० पैकी १६७, तिरोडा २७५ पैकी २३१, आमगाव १५० पैकी ११९, सडक-अर्जुनीत २५० पैकी १४५, देवरीत ३०० पैकी २००, अर्जुनी-मोरगाव ३०० पैकी २५४ व सालेकसात २५० पैकी १७० विहीरींचा समावेश आहे.

तर काम सुरू झालेल्या विहीरींची संख्या गोरेगाव २२४, गोंदिया १४०, तिरोडा १८१, आमगाव ३५, सडक-अर्जुनी ६१, देवरी ६२, अर्जुनी मोरगाव १६२ व सालेकसाच्या ५४ विहीरींना भरपूर पाणी लागले आहे. विहीरींमध्ये बोअरवेल बसविण्यात आलेल्या विहीरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहीरींवर बोअरवेल तयार करण्यात आले. सिंचन विहीरीसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. यातील १५ कोटी ७९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले. आता ६ कोटी ७० लाख १६ हजार रूपये पंचायत समित्यांकडे शिल्लक आहेत. गोरेगाव पंचायत समितीने ४ कोटी ५ लाखापैकी दोन कोटी ४४ लाख ३६ हजार, गोंदिया २ कोटी ९५ लाखापैकी १ कोटी ३९ लाख ९८ हजार, तिरोडा २ कोटी ५२ लाख ५० हजारापैकी २ कोटी ६ लाख ८७ हजार, आमगाव एक कोटी ६५ लाखापैकी ९२ लाख ७३ हजार, सडक-अर्जुनी २ कोटी १२ लाख ५० हजारापैकी एक कोटी ५७ लाख ६० हजार, देवरी दोन कोटी ८० लाखापैकी २ कोटी ५५ लाख २ हजार, अर्जुनी-मोरगाव ४ कोटी ३७ लाख ५० हजार पैकी ३ कोटी ६४ लाख ७८ हजार व सालेकसा तालुक्यात २ कोटी २ लाख ५० हजारापैकी एक कोटी १८ लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.