Home विदर्भ नागपूरच्या त्या भाजपा कार्यकर्त्याकडे सापडले ते गोमांसच !

नागपूरच्या त्या भाजपा कार्यकर्त्याकडे सापडले ते गोमांसच !

0

नागपूर, दि. 15 – गोमांस विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी दोन दिवसांपूर्वी सलीम इस्माईल शहा (३२) नामक तरुणाला बेदम मारहाण केली होती. तो भाजपाचाच कार्यकर्ता होता. या प्रकरणी आता फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला असून, सलीमकडे गोमांस असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोमांस बंदी कायद्यातंर्गत त्याच्या विरुद्ध जलालखेडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला भाजपामधून निष्कासीत करण्यात आले असल्याचे भाजपचे जिल्ह्याध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी सांगितले.कथित गोरक्षकांनी सलीमला मारहाण करताना त्याच्या अ‍ॅक्टिव्हाचीही तोडफोड केली. नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या भारसिंगी येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, सलीम हा भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता आहे.

Exit mobile version