Home विदर्भ आम. रहांगडालेंच्या पुढाकाराने 3 हजार हेक्टर शेतीला मिळाले पाणी

आम. रहांगडालेंच्या पुढाकाराने 3 हजार हेक्टर शेतीला मिळाले पाणी

0

गोंदिया,दि.21- संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. गोंदिया जिल्ह्यात तर कोरड्या दुष्काळाते सावट आहे. अशा परिस्थितीत गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नामुळे खळबंदा जलाशय परिसरातील 3 हजार हेक्टर भातशेतीला धापेवाडा उपसा सिंचन टप्पा 1 मधील पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यातील लोकभातशेतीवर अवलंबून आहेत. यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने धान पिक धोक्यात आले आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रविवार (दि.२०) ला शेतकऱ्यांना रोवणी लावण्यासाठी धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. १ चे पाणी खळबंधा जलाशयात सोडण्याच्या सूचना प्रशासनाला दिले. या पाण्यामुळे खळबंधा जलाशय परिसरातील ३ हजार हेक्टर शेतजमिनीत रोवणी पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही अंशी हसू फुलले आहे.
यासोबतच सिंचन विषयक सोयी उपलब्ध करून देण्यासाटी विधानसभा क्षेत्रात धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.२ च्या कामाकरिता १०० कोटी शासनाकडून मंजूर करून टप्पा क्र.२ चे पाणी पाईपलाईनद्वारे बोदलकसा व चोरखमारा जलाशयात सोडण्यात येणार आहे. सदर कामाचे टेंडर होणार असून नोव्हेंबर पर्यंत कामाला सुरवात होणार आहे.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार विजय रहांगडाले, सुनील पालांदुरकर , डाॅ.वसंत भगत, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ढोरे,उपविभागीय पाटबंधारे अधिकारी दिलीप चौरागडे , उपअभियंता पंकज गेडाम, शाखा अभियंता डी.बी.शरणागत , तिरोडा पं.स.चे माजी सभापती प्रभूराज सोनेवाने, गुड्डू लिल्हारे, राजेश उरकुडे, शंकर टेंभरे, बंटी श्रीबांसरी, काशीराम लांजेवार, नेहरू उपवंशी, दीपक गीरेपुंजे, मुकेश अग्रवाल,नीरज सोनेवाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version