पोहरादेवी येथे ‘लोटा’ बहाद्दरांची धरपकड

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

यवतमाळ,दि.24- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील आठ दिवसांपासुन सुरु करण्यात आलेल्या गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कारवाईने लोटा बहाद्दरांचे धाबे चांगलेच दणाणले असुन जिल्ह्यात तीसरी मोठी कारवाई मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे करण्यात आली. संकल्प स्वच्छतेचा-स्वच्छ महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा भाग म्हणुन जि. प. आणि पं. स. च्या गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कृती दलाने काल सकाळी ४.३० च्या सुमारास मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील हागणदारी गाठली. गावाच्या चारही बाजूने नाका बंदी करुन उघड्या​वर शौचास जाणाऱ्या ​६७ व्यक्तींची धर पकड केली आणि ३७ हजार सातशे रु. रोख स्वरुपात दंड वसुल करण्यात आला. पकडलेल्या लोकांचा रोष शांत करण्यासाठी मानोरा पोलीस स्टेशनहुन पोलीसाची जादा कुमक मागवावी लागली होती.
स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्वात उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी हागणदारीत नाका बंदी ही धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत एका दिवशी एकाच गावाला लक्ष्य करुन पोलीस प्रशासनाच्या मदतीने गुड मॉर्निंग पथकासोबत धडक कृती दलासह हागणदारीवर पाळत ठेवण्यात येते. जिल्ह्यातील शिरपुन जौन, अनसिंग या ग्रामपंचायती नंतर मानोरा तालुक्यातील पोहरादेवी या गावातही सकाळी ४.३० च्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी ग्रामपंचायती मध्ये दंड वसुलीचे काऊंटर(कक्ष) लावण्यात आले होते. दंड भरण्यास नकार देणाज्या २९ लोकांना मानोरा येथील पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. त्यापैकी २५ लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये दंड भरल्यानंतर त्यांची लगेच सुटका करण्यात आली.