Home विदर्भ गणेश विसर्जन मिरवणुकीत पिकअप गाडीने भाविकांना चिरडले

गणेश विसर्जन मिरवणुकीत पिकअप गाडीने भाविकांना चिरडले

0

चंद्रपूर,दि.04- जिल्ह्याच्या वायगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्या भाविकांना वाहनाने चिरडले असल्याची दुखःद घटना समोर आली आहे. वायगाव येथील गणेश मंडळ मूर्ती घेऊन भक्तगण विसर्जनाला नाचत गाजत जात होते. दरम्यान गणेश मूर्ती असलेल्या वाहन चालकाने निष्काळजीपण केल्यामुळे वाहनासमोर नाचणारे भक्तगण चिरडल्या गेले. मूर्ती असलेल्या पिकअप वाहनाने अचानक वेग घेतल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. झालेल्या या अपघातात २५ ग्रामस्थ जखमी झाले असून मनीषा किन्नाके(१८) या मुलीचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Exit mobile version