Home विदर्भ वैद्यकिय महाविद्यालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात घाणिचे साम्राज्य

वैद्यकिय महाविद्यालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात घाणिचे साम्राज्य

0

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.०६-जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हास्थळी असलेल्या कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आरोग्य सेवेच्या नावावर फक्त रूग्णांचे धिंडवडे काढले जात असल्याचे चित्र आहे.त्यातच या दोन्ही रुग्णालयाच्या स्वच्छतेचाही बोजवारा उडालेला आहे.शहरात जसे घाणिचे ढिगारे बघावयास मिळतात,त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय म्हणून सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा सामान्य केटीएस रुग्णालयात स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले.सोबतच रुग्णालय प्रशासनाच्यावतीने रुग्णांच्या नातेवार्इंकावर सुध्दा कुठलेच नियंत्रण नसल्याने रुग्णांचे नातेवाईक सुध्दा उरलेले अन्न हे मोकळ्या जागेत फेकत असल्याचे चित्र बघावयास मिळते.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पहिल्या व दुसèया माळ्यावर खिडक्यांच्या शेजारी व वहाèड्यांतील सज्य्यावर शिळे अन्न फेकल्याने त्या दुर्गंधीमुळे रुग्णालयातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.त्या फेकलेल्या अन्नाला स्वच्छकरण्याकडे स्वच्छतेच्या कंत्राट असलेल्या स्वच्छता कामगारांनी अद्यापही लक्ष दिले नसल्याचे चित्र आजही बघावयास मिळते. एकतर रूग्णालय परिसरात पाहिजे तशी स्वच्छता नाही. शिवाय येथील अधिकारी व कर्मचाèयांचा मनमर्जी कारभार रूग्णांच्या जीवावर उठला आहे.रूग्णालयातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारला असता रूग्णालयातील अस्वच्छतेचा गलथान कारभार आज मंगळवारला नजरेस पडला.
06 Sept 25जिल्हास्थळावर केटीएस व बिजीडब्ल्यु रूग्णालय आहेत. अवघ्या जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिक उपचाराची आस धरून येथे येतात. मात्र येथे उपचाराच्या नावावर अक्षरश: रूग्णांचे हाल होत असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. येथील रूग्णालयांची स्थिती बघावयाची झाल्यास रूग्णालय परिसरात सांडपाणी व घाण ही सामान्य बाब झाली आहे. बाई गंगाबाई रूग्णालयात तर रूग्णांच्या नातेवाईकांना घाण व चिखलातच आपले धुणे- भांडे करून त्याच वातावरणात वावरावे लागत असल्याचे चित्र आहे. तर केटीएस रूग्णालयात याहीपेक्षा बिकट स्थिती आहे. येथे तर स्वच्छतेचा दुष्काळच दिसून येतो. सफाई अभावी रूग्णालय परिसरात ठिकठिकाणी शिळे अन्न पडल्याचे दिसून येते. त्यावर माश्या व किटकांसह वहारांचा मुक्त संचार काही नवी गोष्ट नाही.
रूग्णालयात तळमजल्यावर पाण्याची मशीन लावण्यात आली आहे. मात्र मशीन बंद असल्याने नागरिकांना हातपंपाच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. रूग्णांना ने-आण करण्यासाठी लिफ्ट आहे मात्र ति ही नादुरूस्त.तर वॉर्डांतच उघड्यावर औषधांचे वेस्टेज व घाण ठेवलेल्या असल्याचेही बघावयास मिळाले. यावरून या रूग्णालयांत उपचार घेणारे रूग्ण कितपत सुरक्षीत आहेत यावरच प्रश्नचिन्ह लागते.रुग्णालय परिसरातील मागील भागात केरकचा मोठ्या प्रमाणात वाढलेला असून कचèयाचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप मुक्तसंचार करतांना दिसून येतो कचक्तयातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे.अशा या वातावरणात रुग्णांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे.

Exit mobile version