Home विदर्भ भोंगळ कारभारः देवरी येथे चार दिवसापूर्वी केलेली नाली कोसळली

भोंगळ कारभारः देवरी येथे चार दिवसापूर्वी केलेली नाली कोसळली

0
देवरी,दि.01 (प्रतिनिधी)- नावाजलेल्या देवरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.4 मध्ये चार दिवसापूर्वी तयार करण्यात आलेली सीमेंट क्रॉंक्रिटची नाली आज झालेल्या पावसात कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणाला घेऊन नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराविषयी देवरीकरात चांगल्याच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

सविस्तर असे की, देवरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र 4 मध्ये आंबीलकर वाड्यापासून ते संगीडवार वाड्यापर्यंत सांडपाणी वाहून जाण्यासाठी कॉंक्रिटची नाली तयार करण्यात आली. सुमारे 50 मीटर लांबीची ही नाली केवळ चार दिवसापूर्वीच तयार करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. आज दुपारी झालेल्या पावसात सदर नाली पूर्णतः कोसळली. परिणामी, नगर पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या सुमार दर्जाचे दर्शन देवरी करांना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.

यासंबंधात सोशियल मिडीयावर सुद्धा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. याविषयी एका नागरिकाने तर ‘अच्छे ठेकेदार की पहचान’ अशी उपरोधिक टीका केली.

Exit mobile version