Home विदर्भ गृहराज्यमंत्री अहिरांनी घेतली विषबाधित शेतकऱ्यांची भेट

गृहराज्यमंत्री अहिरांनी घेतली विषबाधित शेतकऱ्यांची भेट

0

यवतमाळ,दि.14-  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील पीक कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधित झालेल्या शेतकऱ्यांवर उपचार सुरु आहे.त्या विषबाधित शेतकऱ्यांची  रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विचारपूस केली.त्यांना रुग्णालयाच्या माध्यमातून मिळत असलेल्या सेवांची चौकशी केली. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या विषबाधित शेतकऱ्यांच्या आरोग्याची शहानिशा करीत वैद्यकीय सेवा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्राधान्याने पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगतिले.वैद्यकीय सेवा घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली.

Exit mobile version