Home विदर्भ असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करा-देवरी ओबीसी संघटना

असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करा-देवरी ओबीसी संघटना

0
देवरी,दि.30  : राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी प्रवर्गातील १०३ जातींना क्रिमीलेयर तत्त्वातून वगळल्याचे वृत असून ओबीसी संवर्गातील अनेत जातींचा उल्लेख नसल्याची माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. सरकारने ओबीसीमध्ये अश्याप्रकारे भांडण न लावता ओबीसी प्रवर्गावर असैवंधानिक लादलेली क्रीमीलेयरची अटच कायमस्वरुपी रद्द करावी अश्या मागणीचे निवेदन देवरी तालुका ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने तहसिलदारामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघ देवरी तालुका अध्यक्ष सुदर्शन लांडेकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाध्यक्ष कृष्णा ब्राम्हणकर,भोजराज फुंडे,सुरेश चन्ने, मुकेश डी.कावळे,विक्रम वंजारी,मधुकर मांदाडे,बाळकृष्म बहेला,विजय डहाके,राजेश भुते,डुडेश्वर बनसोड,प्रफुल खेडीकर आदी ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version