Home विदर्भ गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत चिचोडा येथे नागरिकांनी उभारले नक्षलविरोधी स्मारक

गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत चिचोडा येथे नागरिकांनी उभारले नक्षलविरोधी स्मारक

0

गडचिरोली,दि.03 : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील येणार्या गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणार्या चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे.
चिचोडा गावात गट्टा पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३१ आॅक्टोबर रोजी जनजागरण मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित नागरिकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण पोलिसांतर्फे करण्यात आले होते. जनजागरण मेळाव्यादरम्यान ग्रामस्थांनी नक्षलविरोधी स्मारक बांधले. नक्षल्यांविरोधात गावातील नागरिकांनी घोषणा दिल्या. गावात नक्षल्यांच्या प्रवेशाला बंदी घातली जाईल, असा इशारा दिला. जनजागरण मेळाव्यादरम्यान पोलिसांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. चिचोडा गावातील समस्या जाणून घेतल्या.या समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग इतर विभागांकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन गट्टा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी जे.व्ही. मोरे यांनी केले.

Exit mobile version