Home विदर्भ रामगड आश्रमशाळेचा विद्यार्थी बेपत्ता

रामगड आश्रमशाळेचा विद्यार्थी बेपत्ता

0

कुरखेडा,-तालुक्यातील रामगड येथील शासकीय आश्रमशाळेतील एक विद्यार्थी ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. याबाबत मुलाच्या पालकाने पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. महिंद्र राजाराम पदा (१७) असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव असून, तो कुरखेडा तालुक्यातील ढुशी (शिवणी) येथील रहिवासी आहे.
महिंद्र पदा हा रामगड येथील आश्रमशाळेत अकराव्या वर्गात शिकत होता. ३ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास तो दप्तर घेऊन घरून निघाला. मात्र मुलगा शाळेत गेला की नाही, याबाबत चौकशी करण्यासाठी महिंद्रची आई एका युवकासह शाळेत गेली असता, महिंद्र शाळेत हजर नसल्याचे सांगण्यात आले. तसेच महिंद्र मागील १३ जानेवारीपासूनच शाळेत गैरहजर असल्याची नोटीसही महिंद्रच्या आईच्या हातात देण्यात आली. यामुळे महिंद्रचे आई-वडील धास्तावले असून, त्यांनी पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील तीन विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची घटना ताजी असतानाच आता रामगडच्या आश्रमशाळेतूनही एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याने पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version