Home विदर्भ सडक/अर्जुनी येथे स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न

सडक/अर्जुनी येथे स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न

0

सडक/अर्जुनी ,दि.१० : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा नुकतीच पंचायत समिती सभागृह सडक/अर्जुनी येथे घेण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी एस.टी.तुरकर, डी.जे.कापगते, आर.पी.उगले, के.ए.बडवाईक, एम.एस.धोंगडे, एल.आर.कटरे, भारत बोदेले व तालुक्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेत ए.पी.मेश्राम, डी.डी.साखरे व डी.ए.दरवडे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
वक्तृत्व करंडक स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून सायमा पठाण(प्रथम), हसीन मोहुर्ले(द्वितीय), रोहीत कापगते(तृतीय) तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून योगिता पाखमोडे(प्रथम), अश्विन मेळे(द्वितीय), शिल्पा गेडाम(तृतीय) विजेते स्पर्धक ठरले. सर्व विजेत्या स्पर्धकांना सहायक गटविकास अधिकारी एस.टी.तुरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आर.पी.उगले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एम.एस.धोंगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एल.आर.कटरे, आर.एस.राऊत व बी.डी.साखरे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version