Home विदर्भ खा.पटेलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

खा.पटेलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

अर्जुनी मोरगाव,दि.24ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित तालुका मेळाव्याचे उदघाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते पार पडले.यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी काही लोक फक्त भाषणबाजी करुन सामान्य माणसांची फसवणूक करण्याचे काम करतात.अशापासून सावध राहत सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शेतकरी,शेतमजूरांच्या हितासाठी सातत्याने लढा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी करुन घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.यावेळी इतर पक्षातील कार्यकर्तांचा पटेलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला.यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन,प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सेल अध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापुरे,जिल्हा रायुका अध्यक्ष व जि.प.सदस्य किशोर तरोणे,जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,केतन तुरकर,यशवंत परशुरामकर,नाजुका कुंभरे, भाष्कर आत्राम,सुधीर साधवानी,रतीराम राणे,हेमकृष्ण संग्रामे,नारायण भेंडारकर,नामदेव डोंगरवार,चित्रलेखा मिश्रा,भोजराम रहिले,राकेश लंजे,लोकपाल गहाणे, शिशुला हलमारे,योगेश नाकाडे,रमन उके,कान्हा बघेले,सौरभ गौतम,योगी येडे आदी मान्यवर  मंचावर उपस्स्थित होते. कार्यकर्ता मेळाव्याला तालुक्यातील सरपंच,उपसरंपच,ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version