Home विदर्भ भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सरंपचा चा पायउतार

भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सरंपचा चा पायउतार

0

चंद्रपुर,दि.07,(विशेष प्रतिनिधी) :- जिल्हयातीली घुग्घूस ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा मेश्राम यांच्यावरील अविश्वास ठराव १५ विरुद्ध १ मताने मंजूर झाल्याने त्यांना पदावरुन पायऊतार व्हावे लागले आहे. पुष्पा मेश्राम यांनी ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केला होता. काँग्रेसच्या सरपंच पुष्पा मेश्राम यांच्यावर भाजपा व काँग्रेसच्या सदस्यांनी एकत्रित येत अविश्वास ठराव ३१ जानेवारीला तहसीलदारांकडे दाखल केला होता. याची दखल घेत तहसीलदारांनी ६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता ग्रामपंचायमध्ये सभा बोलाविली होती. तहसीलदार संतोष खांडरे, चंद्रपूरचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत सचिव आशिष चात्रेश्वर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत ठराव १५ विरुद्ध १ मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुष्पा मेश्राम यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले.
ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांच्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच अनधिकृत व्यापारी संकुलासाठी जुन्या बसस्थानकाला वाहनतळ बनविण्याच्या मुद्यावर मोठे ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि सरपंचामध्ये मोठे महाभारत घडले. याला विरोध करीत सरपंच मेश्राम यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अविश्वास ठरावाची भूमिका उपसरपंचासह सदस्यांनी घेतली होती. भ्रष्टाचाराला विरोध केला म्हणूनच सरपंच पुष्पा मेश्राम यांना पायउतार व्हावे लागले, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान सहा महिन्यांकरिता सरपंचपदाचा पदभार उपसरपंच संतोष नुने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकाची जागा अनधिकृत व्यापारी संकुलाच्या वाहनतळासाठी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे

Exit mobile version