Home विदर्भ तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलेवर रानडूकराचा हल्ला

तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलेवर रानडूकराचा हल्ला

0

चंद्रपूर,दि.21 : तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी 8 वाजताचे सुमारास घडली.मध्य चांदा वनविभागातील पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील बिट घनोटी कक्ष क्र. 87 मध्ये रेखा बंडु उईके (वय 45 वर्ष मु. घनोटी तुकूम) ही महिला गावातील इतर महिला पुरुषांबरोबर तेंदूपाने गोळा करण्यास गेली असता रानडूकराने तिच्यावर हल्ला केला. यात तिच्या हाता-पायाला जखमा झाल्या असून तिला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागात तेंदुपत्ता संकलनाचे काम चालु असुन मजुर वर्ग जंगलामध्ये तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. आज सकाळी 8 वाजता रानडूकराने सदर महिलेवर हल्ला केला पायाला, हाताला व डोक्याला मोठ्या प्रमानात जखम झाली असुन तिला सहकारी मजूरांनी गावात आणले व गंभीर दूखापत झाल्याने 108 ने प्रा. आ. केंद्र पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले.

Exit mobile version