Home विदर्भ मेळाव्याच्या माध्यमातून बँकांनी शेतकèयांचे प्रश्न सोडवावे-पालकमंत्री बडोले

मेळाव्याच्या माध्यमातून बँकांनी शेतकèयांचे प्रश्न सोडवावे-पालकमंत्री बडोले

0
गोंदिया,दि.७ः-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र व लाभार्थी ठरलेल्या सर्व शेतकèयांची यादी प्रत्येक गावाच्या चावडी, ग्रामपंचायत व बँकेच्या दर्शनी भागात लावावी. तसेच एनपीए असलेले शेतकरी लाभार्थी कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत. याबाबतची जाणीव शेतकèयांना व बँकांना करून देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करून बँकांनी शेतकèयांचे प्रश्न सोडवावे व खरीप हंगाम २०१८ करीता पीककर्ज मंजुरी व वितरण करण्याबाबतचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी  बँका व जिल्हा प्रशासनाला दिले.
ते जिल्हाधिकारी कार्यालयात  ७ जून रोजी आयोजित छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोंदिया उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तिरोडा उपविभागीय अधिकारी गंगाराम तलपदे, अर्जुनी मोर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, बँकेचे जिल्हा नोडल अधिकारी सिल्हारे, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल इंगले, माजी जिप उपाध्यक्षा रचना गहाणे, देवरीचे नायब तहसीलदार आर. टी. लांजेवार आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बडोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले असून ११ जून रोजी गोंदिया व तिरोडा, १२ जून रोजी आमगाव, देवरी व सालेकसा तालुका आणि १३ जून रोजी सडक अर्जुनी, अर्जुनी-मोर व गोरेगाव येथे मेळावा घेण्यात येणार आहे.

Exit mobile version