Home विदर्भ गोंदियापयर्ंत धावणार मेट्रो; ६ महिन्यांत घोषणा

गोंदियापयर्ंत धावणार मेट्रो; ६ महिन्यांत घोषणा

0

गोंदिया, दि.०८ः-राज्य शासनाच्या वतीने महामेट्रो नागपूरचा विस्तार रामटेक, भंडारा, वर्धा इथपयर्ंत केल्याने याचा विस्तार गोंदियापयर्ंत करण्यात यावा, अशी मागणी ड्रामाच्या वतीने लावून धरण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी माजी आ. रमेश कुथे, ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विस्तार करण्याची मागणी केली. त्यावर येत्या ६ महिन्यात महामेट्रोचे गोंदियापयर्ंत विस्तार करण्याची घोषणा करणार असल्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला गटकरी यांनी दिल्याने आता गोंदियापयर्ंत महामेट्रो धावणार आहे.
डेली रेल्वे मुवर्स संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, रेल्वे कमेटीचे सदस्य मेहबुब हिरानी, नटवरलाल गांधी, विष्णू शर्मा, माजी आ. रमेश कुथे यांनी नागपूर येथे केंद्रिय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नागपूरपयर्ंत प्रस्तावित असून तो गोंदियापयर्ंत करण्यात यावा, याशिवाय बिलासपूर झोन अंतर्गत रेल्वे प्रवासी गाड्या दुर्ग व बिलासपूर वरून धावतात.
त्या गोंदिया वरून संचालित करण्यात याव्यात, तसेच भंडारापयर्ंत मेट्रो धावणार असून तिचा विस्तार गोंदियापयर्ंत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने केले होते. शिष्टमंडळाला गडकरी यांनी येत्या ६ महिन्यात मेट्रोचा गोंदियापयर्ंत विस्तारची घोषणा करणार असल्याचे आश्‍वासन दिले. यामुळे नागपूर मेट्रोचा विस्तार गोंदियापयर्ंत होण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत

Exit mobile version