Home विदर्भ गोंदियात चक्रवर्ती राजाभोज प्रतिमेचे अनावरण

गोंदियात चक्रवर्ती राजाभोज प्रतिमेचे अनावरण

0

पोवार समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार
गोंदिया : पवार प्रगीतीशील मंच व राजाभोज पुतळा स्थापना समितीच्यावतीने आज १ मार्चरोजी चक्रवर्ती राजाभोज यांच्या प्रतिमेची स्थापना करुन मध्यप्रदेशचे कृषीविकास मंत्री ना.गौरीशंकर बिसेन यांच्या हस्ते राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम.शरणागत यांच्या अध्यक्षतेत अनावरण करण्यात आले.कायर्क्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय राजाभोज स्मारक समितीचे अध्यक्ष कन्हैयालाल बोवाडे,आमदार विजय रहांगडाले,आमदार रवी राणा,आमदार मधु भगत,माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले,इंजि.राजेंद्र पटले,भारती पारधी,मौसम हरिणखेडे,पुरुषोत्तम कटरे,लिखेंद्र बिसेन,राजाभोज स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाब बोपचे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.राजाभोज यांच्याप्रतीमेचेपुजन करुन कायर्क्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी माजी आमदार हेमंत पटले यांनी पोवारीत भाषण करुन सवार्ंचे लक्ष वेधले.उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.तसेच समितीच्यावतीने नवनिवार्चित लोकप्रतिनिधींचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Exit mobile version