Home विदर्भ गोंदिया जिल्ह्याीतल 9 महसुल मंडळात अतिवृष्टी

गोंदिया जिल्ह्याीतल 9 महसुल मंडळात अतिवृष्टी

0
गोंदिया,दि.22- जिल्ह्यात आठवभरापासून दमदार पाऊस येत असून पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले व धरण पाणीसाठा मुबलक प्रमाणात वाढला असून सरासरी ८५ टक्के पाऊस पडला आहे.रात्रीलाही रतनारा,तिरोडा,वडेगाव,महागाव,अर्जुनी मोरगाव,मुंडिकोटा,केशोरी,डव्वा,सडक अर्जुनी व सौंदड या महसुल मंडळाच्या ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असून सकाळपासून जिल्ह्यातही रिमझिम पाऊस सुरु झाले आहे.तालुका निहाय स्थिती बघता जिल्ह्यात १ जून ते २० ऑगस्टपयंर्त गोंदिया तालुक्यात ८६८.९८ मिमी. तर गोरेगाव तालुक्यात ९१९.४९ मिमी., तिरोडा७३४.३८ मिमी., अर्जुनी-मोर ८९४.२९ मिमी., देवरी ७९१.३५ मिमी., आमगाव  ९४०.८२ मिमी., सालेकसा ७७५.३५ मिमी., सडक अर्जुनी ९९३.६३ मिमी. असा जिल्ह्यात ८५६.०३ मिमी सरासरी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून ज्याची टक्केवारी ८५ टक्के आहे.
 समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात  (दि.२०) दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाने सुरूवात केली. यात अनेक गावांचा संपर्क तुटला असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महागाव, सिरोली, निलज, इटखेडा यांचा अर्जुनी मोरगाव तालुकास्थळाची संपर्क तुटला होता. पुरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाला असून खबरदारी म्हणून उपाययोजना केली जात आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मालकनपूर येथील पांडुरंग मेश्राम यांच्या घराजवळील सार्वजनिक विहिर अतिवृष्टीच्या पावसामुळे पुर्णत खचली गेली आहे.या विहिरीवर पाणीपुरवठ्यासाठी लावलेले पाच मोटारपंप सुध्दा दाबल्या गेले आहेत.तालुक्यात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत.त्यामुळे काही मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.या अतिवृष्टीमुळे ४ घरे पुर्णतः,१६६ घरे अंशतःतर ८ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीचा आकडा सुमारे १० लाखाच्यावर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तालुक्यातील खांबी-बोंडगावदेवी,खामखुरा-महागाव,बोरी-मांडोखाल,ईटखेडा-महागाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली आहे.

Exit mobile version