Home विदर्भ मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा उत्साहात

मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा उत्साहात

0

सालेकसा,दि.17ः- तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाचे किंवा सामाजिक संघटनेचे विद्यार्थ्यांसाठी चळवळ नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा च्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे गठन करण्यात आले. ग्लोब कॉम्प्युटर सालेकसा येथे आयोजित .महाराष्ट्राचा विकास आराखडा आणि सौंदयदृष्टी ह्या विषयावर राज ठाकरे ह्यांनी सतत ४ वर्षे पर्शिम घेऊन तयार केलेल्या विकास आराखड्याची चित्रफीत दाखवत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
मनविसे चे राज्य कार्यकारणी सदस्य उदय पोफळी ह्यांनी मार्गदर्शन करत राज ठाकरे ह्यांचे विद्याथ्यार्साठीचे धोरण आणि केलेले कार्य तसेच नाशिक मॉडल ह्या विषयावर विस्कृत चर्चासत्र सादर केला. ह्यात उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सांगून त्यांच्या उत्तर सादर करत चित्रफीतच्या माध्यमाने पक्षाने केलेले कायार्चा प्रेझेन्टेशन सादर केला.

Exit mobile version