गोंदिया,दि.31 : गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपूर्ण व्यवस्था होईल, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
यामुळे गोंदिया तालुक्यात हेल्थ वेलनेस स्किम लागू झाली असून ५६ आरोग्य उपकेंद्रामध्ये आयुर्वेदिक चिकित्सकाची नियुक्ती करण्यात आली. या चिकित्सकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील २० कुटुंबीयांसोबत स्वत: चिकित्सक दररोज तपासणी व आरोग्य सेवा देतील.
शिबिरात ४२५ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर माता व कुपोषित बालकांची तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधांचे वितरण करण्यात आले.११ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी केटीएस, बी.जी. डब्ल्यू.रुग्णालयात पाठविण्यात आले.