Home विदर्भ क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त प्रबोधन शुक्रवारला

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त प्रबोधन शुक्रवारला

0
गोंदिया,दि.21 : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीदिनानिमित्त २३ नोव्हेंबर रोजी आंबेडकर भवन मरारटोला गोंदिया येथे समज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद््घाटक डॉ. नामदेवराव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते होणार आहे. नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, महिल फेडरेशनल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गोंडवाना मित्र मंडल, आदिवासी हलबा/हलबी संघटना, विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती २३ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त आदिवासींच्या विषयांवर समाज प्रबोधन करण्यात येणार आहे. समाज प्रबोधन अधिव्याख्याता प्रा. राजकुमार हिवारे, प्रा. सविता बेदरकर, इंजि. देवेंद्र रोडगे, डॉ. प्रशांत कटरे हे करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, तहसीलदार सी.आर. भंडारी, कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी अधिकारी घनश्याम तोडसाम, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, उपविभागीय अभियंता सुभाष घरतकर, महासचिव दुर्गाप्रसाद कोकोडे, श्रावण राणा, भरत मडावी, प्रसन्न ठाकूर, प्रमिला सिंद्रामे, अजय कोठेवार आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे डॉ. दिगंबर मरस्कोल्हे, डॉ. नितीका मरस्कोल्हे, डॉ. मनीष पंधरे, डॉ. पल्लवी पंधरे तथा आदिवासी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version