Home विदर्भ ढिवर समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

ढिवर समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

0

गोंदिया,दि.20 : दिवाळीचा सण आटोपल्यानंतर ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक जाती, समाजातील व्यक्ती आपल्या घरातील मुला-मुलीच्या लग्नाचा चिंतेत असतात. परंतु योग्य स्थळ, मुला-मुलीचा शोध घेण्यात नाहक वेळ व पैसा खर्च होतो. यामुळे भवभुती रंगमंदिर येथे ढिवर समाजातील कार्यकर्त्यांनी समाजातील लोकांना उपवर-वधू परिचय संमेलनाच्या माध्यमातून एकत्र आणले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहकारमहर्षी जतिराम बर्वे, रामायण रचियते महर्षी वाल्मीकी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण, दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी आयोजक समितीचे अध्यक्ष परेश दुरुगवार यांनी समितीची भूमिका मांडली. व्यासपीठावर संघर्ष वाहिनी-विमुक्त भटक्यांचे संयोजक दीनानाथ वाघमारे, चंद्रलाल मेश्राम, संजय केवट, सुनीता मोहनकर, मत्स्यपालन संस्था कोटराचे अध्यक्ष विनोद मेश्राम, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नीलकंठ ठाकरे, केशोराव मडावी, के. टी. कांबळे, सेवानंद तुमसरे, शामनाद महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोज मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक उपराव मांढरे केले. आभार देवीलाल घुमके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयचंद नगरे, मनिराम मौजे, ओमकार मोहनकर, जयेंद्र बागडे, सावलराम मन्सू मारबते, कोमेश काबंळे, निलराम कांबळे, सुंदरलाल लिल्हारे, देवीलाल घुमके, शैलेश कांबळे, रोशन मेश्राम, देवीलाल केवट, हौसलाल वलथरे, लक्ष्मी मेश्राम, तुलाराम कुराडे, गणराज नान्हे, यशवंत दिघोरे, यादोराव सोनवाने, राधेश्याम मेश्राम, पुंडलिक कांबळे, रवि दिघोरे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version