Home विदर्भ गोंदिया शहराचे होणार सिटी सर्व्हे-आ.अग्रवालांचे प्रयत्न

गोंदिया शहराचे होणार सिटी सर्व्हे-आ.अग्रवालांचे प्रयत्न

0

गोंदिया,दि.25 : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया शहराचा नव्याने सिटी सर्व्हे करण्यासाठी लागणाऱ्या १ कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे गोंदिया शहराचा नवीन सिटी सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे.शहराच्या विस्तारासोबत मोठ्या प्रमाणात भूमाफियांची संख्या वाढली आहे. भूमाफियांनी अवैधरित्या अनेक भूखंडाची खरेदी-विक्री केली आहे. एक भूखंड अनेक नागरिकांना विकून त्याची रजिस्ट्री करण्यात येत आहे. यामुळे अनेकदा वाद होत आहेत.अनेक कृषी जमिनीला बोगस कागदपत्रांच्या आधारे अकृषक बनवून नागरिकांना विकण्यात येत आहे. सोबतच शासकीय व अशासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्याचा व्यवसाय जोमात सुरू आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या राजस्व विभागाच्या सचिवांना गोंदिया शहराचा नव्याने सिटी सर्व्हे करण्याची विनंती केली होती. त्याचीच फलश्रुती म्हणून राजस्व विभागाने भूमी अभिलेख विभागाला या संदर्भात निर्देश दिले होते. आता भूमी अभिलेख विभागाद्वारे सिटी सर्व्हे करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी शासकीय शुल्क भरण्याचे निर्देश नगरपरिषदेला दिले होते. मात्र, निधीअभावी हे शुल्क भरण्यात आले नव्हते. आता नगरपरिषदेला उपलब्ध विकासनिधीतून जी व्याजाची रक्कम आहे त्यातून १ कोटी रुपये भरण्याची परवानगी नगरविकास विभागाने दिली आहे. यामुळे गोंदिया शहराचा सिटी सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात मास्टर प्लानही लागू करण्यासाठी उपयोगी ठरेल..

सिटी सर्व्हेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अग्रवाल यांचे बांधकाम सभापती शकील मन्सुरी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी, अपूर्व अग्रवाल, श्वेता पुरोहित, सुनील तिवारी, निर्मला मिश्रा, शिलू चव्हाण, क्रांतीकुमार जायस्वाल, दीपिका रूसे, भगवान मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंकट पाथरू, पृथ्वीपालसिंग गुलाटी, अजय गौर, अनिल सहारे, अंकित जैन, अमर रंगारी, वीणा पारधी, सुशील रहांगडाले, ॲड. योगेश अग्रवाल, चुन्नी इसरका, महेबुब अली, कदीर शेख, विष्णू सिद्दीकी, योगेश जायस्वाल, मनोज पटनायक, देवा रूसे आदींनी अभिनंदन केले आहे..

Exit mobile version