Home विदर्भ राकाँची साकोली विधानसभा मतदारसंघ बुथ कमिटीची बैठक

राकाँची साकोली विधानसभा मतदारसंघ बुथ कमिटीची बैठक

0

साकोली,दि.१२ः- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने साकोली विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६२ अंतर्गत येत असलेल्या साकोली,लाखनी व लाखांदूर तालुक्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व बूथ समिती बळकटीकरण विषयावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे यांच्या साकोली स्थित निवासस्थानी बैठक पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन व मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या मार्गदर्शनात ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राकाँपा  प्रदेश सचिव धनंजय दलाल,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे,अविनाशभाऊ ब्राम्हणकार, मदनभाऊ रामटेके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.बैठकीत येत्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करुन प्रत्येक गावात बुथ कमिटी मजबूत करण्यावर भर देण्यात आले.बैठकीला प्रभाकर सपाटे, बालू भाऊ चुंने , अंगराजजी समरीत, डॉ. विकास गभने, नरेश दिवटे ,प्रदीप मासुरकर शैलेश गजभिये, सुरेश बघेल ,धन्नू व्यास ,नागेश वाघये, माया अंबुले लता दुरूकर, जया भुरे, प्रवीण भांडारकर, निलेश घरडे अनिल टेभरे, डॉ अनिल शेंडे आदीची उपस्थिती होती.

Exit mobile version