Home विदर्भ पंकज यादववरील हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाची लढाई

पंकज यादववरील हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाची लढाई

0

गोंदिया : नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता पंकज यादव यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून झाला असून यामागील ‘मास्टरमाईंड’ दुसराच आहे. पोलिसांनी त्या मास्टरमाईंडला शोधून काढावे, अशी मागणी पंकज यादव यांचे कनिष्ठ बंधू नगरसेवक कल्लू उर्फ लोकेश यादव आणि इतर पदाधिकार्‍यांनी केली.
मंगळवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या घटनेमागील पार्श्‍वभूमी सांगितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिव शर्मा, न.प.चे माजी उपाध्यक्ष भगत ठकरानी, बजरंग दलाचे सागर सिक्का, पुरनलाल यादव, राजकुमार यादव आदी उपस्थित होते.
लोकेश यादव म्हणाले, गोंदियात गेल्या अनेक दिवसांपासून डुकरांचा त्रास सर्वच भागात आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या भितीने सर्वांना ग्रासले आहे. त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात मोकाट डुकरांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी पंकज यादव किंवा मी (कल्लू) न.प.उपाध्यक्ष असताना पुढाकार घेतला होता. तेव्हापासून डुक्कर पालन करणार्‍या समाजातील लोक आमचा राग करतात. मात्र आम्ही घाबरणार नाही. जनहितासाठी हा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले.

Exit mobile version