Home विदर्भ मुद्रणालयांनी निवडणूक साहित्य छपाईसाठी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे पालन करावे- शांतनू गोयल

मुद्रणालयांनी निवडणूक साहित्य छपाईसाठी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे पालन करावे- शांतनू गोयल

0

उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा

 भंडारा,दि.17 : केंद्रिय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केलेली आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणारे उमेदवार मुद्रणालयाकडून प्रचाराचे साहित्य छपाई करणार आहेत. यासाठी जिल्ह्यात मुद्रणालयांनी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम  127 ए नुसार कायद्याचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी केले आहे.
 मुद्रणालयांनी पॉम्पलेटभीत्तीपत्रक इत्यादी साहित्य प्रकाशनावरील प्रतिबंधात्मक लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार निवडणूक साहित्याची  छपाई करताना भीत्तीपत्रकपॉम्पलेट इत्यादीच्या मुखपृष्ठावर मुद्रकप्रकाशकाचे नावमोबाईल क्रमांक व पत्ता,  किती प्रतीची संख्या मुद्रीत करणे बंधनकारक आहे. कलम  127 A (2) नुसार साहित्य छपाईसाठी आणणाऱ्या प्रकाशकास स्वत:ची ओळख इतर दोन साक्षीदारांच्या व स्वत:च्या स्वाक्षरीने प्रमाणित करुन ती मुद्रकास देणे बंधनकारक राहील. त्यानंतर मुद्रकांनी छपाई करण्यात आलेले साहित्य व प्रमाणित ओळख पत्राची प्रत प्रतीत दिवसाचे आत छपाईसाठी आलेल्या खर्चासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे.

या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस सहा महिन्याचा कारावास किंवा दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा  दोन्ही ठोठावण्याची तरतूद  कायद्यात आहे. निवडणूक प्रचार साहित्यावर कुठल्याही धर्मवंशजातसमुदाय किवा भाषा किंवा विरोधी पक्षाचे किंवा उमेदवारांचे चारित्र्याचे हनन होईल, अशी शब्द रचनावाक्य वा मुद्दे मुद्रीत करु नयेअशी बाब शिक्षेस पात्र राहील. दुचाकी, तीन चाकीचार चाकी व ई- रिक्षा वाहनावरील लावण्यात येणाऱ्या झेंड्याचा आकार हा फुट अर्धा फुट  किंवा या आकाराचे स्टिकर्स लावता येईल.  परंतू या वाहनावर बॅनर लावण्यास प्रतिबंध आहे. प्रचार फेरीदरम्यान सदर आकारात जिल्हाधिकारी यांनी प्रचार वाहन म्हणून परवानगी दिलेल्या एकाच वाहनावर  झेंडा लावता येईल यासाठी झेड्यांच्या खांबाची किंवा काडी उंची  3 फुट पेक्षा जास्त नसावी. प्रचार फेरीत जे बॅनर हातात पकडण्यासाठी तयार करण्यात येईल त्यांचा आकार फुट साडेचार फूट असावाअसे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Exit mobile version