Home विदर्भ फुलचूर ग्रापं कार्यालयात महाराष्ट्रदिनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण

फुलचूर ग्रापं कार्यालयात महाराष्ट्रदिनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण

0
गोंदिया,दि.04 : ग्राम पंचायत कार्यालय फुलचूर येथे १ मे रोजी  महाराष्ट्र  राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिन (महाराष्ट्र्र  दिन)च्या औचित्य साधून  ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान फुलचूर येथील जिल्हा परिषद कॉन्व्हेंट येथील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणपत्रीका वाटप करण्यात आले.
ध्वजारोहण फुलचूर ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मीबाई मनोहर कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच आशा विजय मेश्राम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन पोंगळे, माजी उपसरपंच अशोक चन्ने, जिप प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक श्री अग्रवाल, ग्रापं सचिव टी.डी. बिसेन, दामोदर बिसेन, ग्रापं सदस्य ममता संजय बघेले उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान फुलचूर येथील जिल्हा परिषद कॉन्व्हेंट मध्ये विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गुणपत्रीका वाटप करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामसिंग लिल्हारे, दुर्गेश गुप्ता, अनिता ऋषीपाल बिसेन, रंजू रामेश्वर  सुरजजोशी, सरस्वती सुभाष नागपुरे, राजेश मस्करे, शामकला संजय पारधी, ललिता भावे, ज्योती पंजारे आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version